१८ वर्षांवरील महिला/पुरुष जे अनाथ व निराधार आहेत, ज्यांना कुणीही नातेवाईक नाहीत अशा लोकांचे पुर्णपणे मोफत संगोपन आपली संस्था करते. अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय उपचार व शेवटचा अंत्यविधी सुध्दा संस्था मोफतपणे करते.
आनंद अनाथ आश्रम सुरु कसा झाला व तसेच आनंद अनाथ आश्रम हा सगळ्या इतर वृध्दाश्रमा पेक्षा वेगळा कसा काय ठरतो, तसेच आनंद अनाथ आश्रमाचे कार्य कसे चालते हयाबद्दल आता आपण थोडे जाणून घेऊयात. अर्थात ह्या प्रश्नांची उत्त्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला अशा एका व्यक्तीचा परिचय बघावा लागेल जे आश्रमाचे सर्वेसर्वा आहेत आंनद अनाथ आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री. गिरीष परशुराम देशपांडे हे एक प्रतिथयश नॅचरोपॅथी डॉक्टर आहेत व त्यांना त्यांच्या व्यवसायानिमित्त बरेच ठिकाणी प्रवास करावा लागतो. प्रत्येक वेळी प्रवासात रेल्वे स्टेशन, बस स्टैंड, सार्वजनिक ठिकाणी कधीकधी अतिशय घाणेरड्या कपडयांमध्ये कसेही केस वाढलेले दिसायला अतिशय ओंगळवाणे लोक आढळून येतात की ज्यांना हात लावणे तर दूरच बघू नये अशा अवस्थेत काही लोक वेगवेगळया ठिकाणी त्यांना दिसायची. त्यांना सतत हा प्रश्न भेडसावत असे की ह्या लोकांना काय करायचे किंवा ह्या लोकांसाठी काय करायचे. अशा लोकांना जगण्याचा काही मार्ग अस्तित्वात नाही का...? आपण त्यांच्यासाठी काही करु शकत नाही आणि याच सततच्या विचारातून आनंद अनाथ आश्रमाची निर्मिती झाली. आनंद अनाथ आश्रम सुरु करण्यापूर्वी सर्वात आव्हानात्मक गोष्ट अशी होती की हा कुठल्याही प्रकारचा वृध्दाश्रम नव्हता की आश्रमात नोंदणी करणाऱ्या व्यक्तींकडे आपण काहीतरी पैसे किंवा मोबदला घेऊ शकतो. इथे येणारा प्रत्येक माणूस हा पूर्णपणे अनाथ होता की ज्याचे जगात कोणीच नातेवाईक नाही. असे लोक आम्हांला काय देऊ शकणार त्यांच्याकडे स्वतःसाठी अन्न, वस्त्र, निवारा यापैकी काहीच नाही. अशा लोकांचे संगोपन करण्यासाठी किंवा त्यांना निवारा मिळवण्यासाठी आपल्या व्यवस्थेमध्ये कुठलेही योग्य उपाययोजना नाहीत. मग अशा लोकांनी काय करायच...? असंच उपेक्षित जीवन जगायच किंवा जेव्हा मरण येईल तेव्हा मरायच का….. ? ह्याच सगळया विचारांच्या तळमळीतून अनाथ, निराधार लोकांची वाईट व हलाकीची परिस्थिती बघून श्री. गिरीष परशुराम देशपांडे यांनी आनंद अनाथ आश्रम या प्रकल्पाची सुरुवात केली.
आनंद अनाथ आश्रम हा सर्व आश्रमांपेक्षा वेगळा अशा कारणांनी
ठरतो की आनंद अनाथ आश्रमाचे घोषवाक्य हे आहे की अनाथ व निराधार लोकांसाठी कायमस्वरुपी मोफत संगोपन.
हा आनंद अनाथ आश्रम सुरु करण्यासाठी आपले संस्थापक अध्यक्ष श्री. गिरीष परशुराम देशपांडे यांनी फार काळजीपूर्वक नेरळ, वांगणी व बदलापूर या शहरातील ग्रामीण भागांची निवड केली.
"ही संस्था खरोखरच समाजसेवेचे अप्रतिम उदाहरण आहे. गरजू आणि अनाथांसाठी त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेकांचे जीवन सुरक्षित आणि समाधानकारक झाले आहे. त्यांच्या समर्पणाची दाद द्यावी लागेल."
आनंद अनाथाश्रम ही यंत्रणा आपण सर्वजण मिळून विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. निसर्गनियमाप्रमाणे मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे, पण यंत्रणा / system कधीच मरत नाही.
आज आपण आहोत पण उत्याची शाश्वती नाही. आपण प्रत्येक जण स्वतःच्या कुटुंबासाठी जीवन जगत असतो. या अनाथ व निराधार लोकांचे कोणत्याही प्रकारचे कुटुंब अस्तित्वात नसते. आपण निर्माण करीत असलेल्या आनंद अनाथश्रम या उपक्रमामध्ये अशा सर्व महिला व पुरुषांचे कायमस्वरुपी मोफत संगोपन करण्यात येत आहे. थोडक्यात आपण एका मोठ्या आनंद महाकुटुंब याची निर्मिती करीत आहोत. काल, आज आणि उद्या आपण या जगात असू किंवा नसू पण या निराधार लोकांच्या संगोपनाचे कार्य या उपक्रमामध्ये / यंत्रणेमध्ये / system मध्ये निरंतर केले जाईल.
“Money makes man perfect” या उक्तीप्रमाणे कोणातीही यंत्रणा टिकवून (ण्यासाठी अर्थाची खुप गरज असते. आपण प्रत्येकजण नोकरी-व्यवसाय करुन अर्थाजन करतो. ही यंत्रणा जिवंत राहण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडुन वार्षिक देणगी म्हणून फक्त १२००/- रुपयांची संस्था अपेक्षा करीत आहे.
अन्नधान्य, कपडे, औषधोपचार, रुग्णोपयोगी साहित्य, राष्ट्रीय सण, लाईट, पाणी सुविधा, वाहतूक व्यवस्था, प्रशासनाचा खर्च व अचानक उद्भवणारे आकस्मित बर्च अशा अनेक अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आम्ही अल्प अशी वार्षिक देणगी सर्वसामान्य जनतेकडून मागणी करीत आहोत.
वर्षातून एकदा आपले नातेवाईक, मित्र, दिवंगत नातेवाईक यांच्या नावाने आपण ही नोंदणी करु शकता. वर्षभरातून येणारे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, दिवंगत नातेवाईकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बाऊ वाटप इत्यादी उपक्रमांसाठी आपण संस्थेशी सहकार्य करु शकता.
आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी आज पर्यंत आपण जगलो.. चला आजपासून आपण आनंद अनाया वम या महाकुटुंबासाठी सर्वजण निळून काहीतरी चांगले करण्यासाठी प्रयत्न करुया.
+91 9172647505
+91 8600045385
शॉप नं ६, मोहन व्हिलोज फेज १, बी मार्टजवळ, भोसले नगर, बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे, ४२१५०३
आजच्या काळात, समाजातील विविध समस्यांना सामोरे जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या कार्यामुळे आम्ही अनाथ, गरजू आणि निराधार व्यक्तींना आधार देत आहोत. तरीही, अजून खूप काही करण्याची आवश्यकता आहे. या कार्यात आपला सहभाग आणि योगदान महत्त्वाचे आहे. बदल घडवण्यासाठी आपण एकत्र येऊन समाजात सकारात्मक बदल आणू शकतो. आपल्या मदतीनेच आम्ही या संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. त्यामुळे, कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि या बदलाचा एक भाग व्हा.
सर्व माहिती मिळवण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा.
Our organization is committed to providing these children with the love, care, and support they deserve to build meaningful and independent lives.
You can see how this popup was set up in our step-by-step guide: https://wppopupmaker.com/guides/auto-opening-announcement-popups/